जत शहरात नियमाची पायमल्ली | मुख्य बाजार पेठेत गर्दी ; पोलीस,नगरपरिषदेकडून बघ्याची भूमिका

0जत,संकेत टाइम्स : जिल्हाधिकारी श्री अभिजित चौधरी यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन दि.1 जूनपर्यंत वाढवत संचारबंदी लागू केली असतानाही जत शहरात सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे.अशा प्रकाराला पोलीसाकडून खुली सुट दिली जात आहे. शहरात जिल्हाधिकारी यांचा आदेश पायदळी तुडविला जात आहे.कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही ,त्यातच कोरोनाने मृत्यु होणारे रूग्ण ही  वाढत आहेत. 


जत नगरपरिषद, पोलीस प्रशासन व  तालुका प्रशासन यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्यानेच जत शहरासह तालुक्यात कोरोना वाढत चालला आहे. याला पोलीस प्रशासन हेच जबाबदार आहे.पोलीस प्रशासन हे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना दिसत नाही.ठाण्याला वरिष्ठ अधिकारी नसल्याने दुय्यम अधिकारी कार्यभार चालवित आहेत.त्यांना अनुभवाची मर्यादा पड़त असून हे दुय्यम अधिकारी गाडीतून खाली उतरत नाहीत तर, पोलीस कर्मचारी फक्त चौकात उभे असलेले दिसतात पण कारवाईच्या नावाने बोंबच आहे. Rate Card144 कलम लागू असतानाही शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दुचाकी,चारचाकी वाहने फिरताना दिसत आहेत.निर्बंध असतानाही गुर्दी दिसत आहे.


  

जत शहरात निर्बंधाची पायमल्ली होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.