जयंत आदाटे,दिनेश सांळुखे यांच्या निधनाने नुकसान ; तहसीलदार
जत :दुष्काळी जत तालुक्यातील लोकभावना प्रखरपणे वेळोवेळी बातमीदारीतून मांडण्याचे चांगले काम दिवंगत पत्रकार जयवंत आदाटे यांनी केले.त्यांच्या विविध प्रकारच्या बातमीत ते नेहमी दुसऱ्याचेही मत मांडत होते.अशी त्यांची समतोल बातमीदारी पहावयास मिळाली.दिनेश सांळुखे सारख्या तरूण वृत्तपत्र विक्रेत्याचे निधनही धक्कादायक आहे,
सध्या कोरोणाच्या या महामारीत कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास त्या आजारापासून कोणी लांब पळू नये.लगेच वेळेत उपचार घेतल्यास या कोरोनासारख्या आजारावर मात करता येते.तसेच या आजारातून बाहेर कसं पडता येईल ही मानसिकता ठेवणे आवश्यक आहे,असे मत तहसीलदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.

जत येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात तहसीलदार बोलत होते.यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तिकर,आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार,हभप तुकाराम बाबा महाराज,मारूती पवार,पत्रकार उपस्थित होते.
जत येथे श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना तहसीलदार सचिन पाटील व मान्यवर
