‘
तासगाव :
तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी आणखी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तासगाव पोलीस व सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे परिसरात ही कारवाई केली. याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचाकेली. सुरू आहे.
अनिकेत संतोष खुळे (वय 19, रा. कात्रज, पुणे), आकाश महिपत मळेकर (वय 20, रा. पापळ वस्ती, बिबेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एक आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विशाल सज्जन फाळके याला यापूर्वीच जेरबंद केले आहे. त्याला 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
वायफळे (ता. तासगाव) येथील विशाल फाळके व संजय फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत. याच वादातून अनेकवेळा खुनी हल्ले, मारामाऱ्या झाल्या आहेत. यातूनच विशाल फाळके याने पुणे येथून आपली टोळी आणून संजय फाळके कुटुंबावर खुनी हल्ला केला.
या हल्ल्यात संजय फाळके, जयश्री फाळके, रोहित फाळके, आशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शिकलगार हे गंभीर जखमी झाले होते. यातील रोहित फाळके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील जयश्री फाळके यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला यापूर्वीच पुणे येथे बेड्या ठोकल्या. तर त्याच्या इतर तीन साथीदारांनाही काल मध्यरात्री पकडण्यात पोलिसांना यश आले. या सर्वांना आज येथील न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. 'एलसीबी' व तासगाव पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली