टाटा पॉवरच्या चार ऑक्सिजन बायपॅप मशीनचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते वाटप

0जत,संकेत टाइम्स : टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट या कंपनीच्या पवन उर्जा विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय जत येथे चार ऑक्सिजन बायपॅप मशीन व करोना प्रतिबंधक किटचे वाटप करण्यात आले. ऑक्सिजन बायपॅप ही मशीन करोना महामारीत प्राणवायू निर्माणकर्ता म्हणून ओळखली जात असून ऑक्सिजन पातळी खाली आलेल्या रूग्णांना नवसंजीवनी ठरेल.ग्रामीण भागातील लोकांना करोना कालावधीत धीर व मानसिक आधार दिला तर होणारी हानी निश्चितच टाळता येईल,असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले.


जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटी म्हणाले की, टाटा पॉवर कंपनी करीत असलेल्या सीएसआर  प्रकल्पामुळे जत व आसपासच्या ग्रामीण भागात त्याचा चांगलाच फायदा झालेला आहे. बचत गट, समाधान मेळावा, शासन आपल्या दारी व जलसंधारणाच्या कामामुळे तालुक्यात आमुलाग्र बदल होताना दिसत आहे.टाटा पॉवर कंपनीचे सीएसआर अधिकारी विश्वास सोनवले बोलताना म्हणाले की, सदर उपक्रम हा टाटा पॉवर कंपनीच्या समाज कल्याण विभागामार्फत होत असुन अशा परिस्थितीत हे संयंत्र लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करेल.Rate Card
साईट इन्चार्ज साहेबराव पुजारी यांनी सांगितले की टाटा समूह हा नेहमीच आपल्या लोकांना मदत करतो. प्रा.तुकाराम सन्नके म्हणाले की, टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातुन देवनाळ गावचा सर्वांगीण विकास झाला असुन माती, पाणी, महिला सक्षमीकरण, सेंद्रिय शेती इत्यादी गोष्टींवर काम झाल्याने सुधारणा झाल्या आहेत.यावेळी तहसिलदार सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर, जत ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी, टाटा पॉवरचे विश्वास सोनवले, साहेबराव पुजारी, ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे, प्रा.तुकाराम सन्नके व रूग्ण उपस्थित होते.

जत : टाटा पॉवरच्या चार ऑक्सिजन बायपॅप मशीनचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.