चौपन्न गावात 15 हजार कुटूंबियाना 72 टन भाजीपाला वाटप | तुकाराम बाबांकडून सलग दुसऱ्यावर्षी मदत
जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या या कठीण काळात शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर सर्वसामान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.पुन्हा दानसूर व्यक्तिमहत्व असलेले हभप तुकाराम बाबांनी पुन्हा तालुक्यातील जनतेच्या मदतीचा हात दिला आहे. लॉकडाऊन मुळे एका बाजूला शेतकऱ्यांचा भाजीपाला बांधावर पडून खराब होवू लागला तर दुसऱ्या भाजीपाला मिळत नसल्याने सर्वसामान्य जतकरांचे हाल सुरू होते.
यावर तोडगा काढत श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे तुकाराम बाबा यांनी सलग दुसऱ्या वर्षी भाजीपाला वाटप करण्याचा निर्णय घेतला.यात शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा तर अडचणीतील नागरिकांना तो वाटायचा.
गेल्या नऊ दिवसात तालुक्यातील 54 गावातील 18 हजार नागरिकांना 72 टन भाजीपाला थेट गावोगावी, घरोघरी जाऊन पोहच केला आहे.
कोरोनाच्या या कठीण काळात तुकाराम बाबा यांनी केलेल्या या कार्याचे जत तालुक्यातील ग्रामस्थांतुन सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील बंडगरवाडी,लकडेवाडी, जाडरबोबलाद, घारळेवाडी 1, घारळेवाडी 2,सोन्याळ, लमाणतांडा अंकलगी, अंकलगी गाव, कोणबगी, मोटेवाडी, कोतेयबोबलाद, करेवाडी, गुलगुंजनाळ, लवंगा, तिकोंडी करेवाडी, पांडोझरी, तिल्याळ, दरीबडची लमाणतांडा, जालीहाळ, पांढरेवाडी, संख आंबेडकर नगर, खंडनाळ लमाणतांडा 2, गोधळेवाडी, राजोबाचीवाडी, मायथळ, कुणीकोनुर, टोणेवाडी, खैराव, पवारवाडी
सनमडी,

कुलाळवाडी, भिवर्गी, करजगी, बोर्गी, आकळवाडी, बालगाव, उटगी तांडा,जालीहाळ बुद्रुक, गिरगाव, माणिकणाळ, मोरबगी, संख मठ, उटगी, निगडी तांडा, कारंडेवाडी, उमदी विठ्ठलवाडी,घोलेश्वर, येळवी, जत स्टील कॉलनी, जत इंदिरा नगर, कोसारी (काही भाग) व माडग्याळ येथे थेट गावोगावी, घरोघरी जात तुकाराम बाबा व त्यांच्या टीमने नागरिकांना मदत केली आहे.
जत तालुक्यातील गावागावात तुकाराम बाबांनी भाजीपाला वाटप केले आहे.
