जतेतील सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करा 

0
90

जत : जत शहरातील प्रमुख बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील बंद पडलेली सिसिटीव्ही यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी आमदार गोपिचंद पडळकर यांनी लक्ष द्यावे,अशी मागणी येथील शिवनगर व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.

कुंभार म्हणाले जत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व शहरातील वाहतूकीच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी जत शहरातील सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी संघटना,व पोलीस प्रशासन यांनी ठिकठिकाणी सि.सि.टी.व्ही.कॅमेरे बसविले होते या सर्व सि.सि.टी.व्ही.कॅमेऱ्याचे केबल कनेक्शन पोलीस स्टेशन ला जोडण्यात आले होते.

  त्यामुळे जत शहरातील प्रमुख बाजारपेठेबरोबरच इतर ठिकाणीही कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासन सतर्क होते.व वाहतूकीची वारंवार होणारी कोंडी ही कमी होत होती.

  परंतु सद्यस्थितीत जत शहरातील प्रमुख बाजारपेठेतील व चौकाचौकात बसविण्यात आलेले सर्वच सि.सि.टी.व्ही.कॅमेरे बंद आहेत.मध्यंतरी येथील शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी  व सिसिटीव्ही यंत्रणा नियंत्रित करणारे संग्राम पवार यांनी बंद असलेले बहुतांशी सिसिटीव्ही आपल्या खर्चाने दुरूस्त केले होते.पण आता पहायला गेले तर जत शहरातील एकही सिसिटीव्ही यंत्रणा सुरू नाही.त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.त्याच प्रमाणे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे.

सिसिटीव्ही यंत्रणाच नसल्याने जत पोलीस ठाण्याची अवस्था अंधळ्यासारखी झाली आहे.शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.अपघात होत आहेत. 

 मध्यंतरी येथिल महाराणा प्रताप चौकातील मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणची दोण दुकाने चोरट्यांनी फोडली होती.तसेच येथील शहिद अंकुश सोलनकर चौकात ही अनेक वेळा दुकान फोडीच्या व अपघाताच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे जत पोलीस स्टेशन चे अधिकारी,नगरपरिषद जतचे अधिकारी व कर्मचारी त्याच प्रमाणे व्यापारी संघटना व सामाजीक कार्यकर्ते यांची बैठक जतचे धडाडीचे आमदार श्री.गोपिचंद पडळकर यांनी घेऊन या बैठकीत बंद असलेल्या सिसिटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत असेही कुंभार म्हणाले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here