जत तालुक्यात दुसऱ्या लाटेत मंगळवारी 100 आत रुग्णसंख्या | 8 जणांचा मुत्यू
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना नव्या रुग्णाची संख्या शंभरच्या आत आली आहे.दररोज तिनशे पर्यत दररोज नवे रुग्ण आढळून येत होते.त्यामुळे धोका वाढला होता.मात्र गेल्या तीन दिवसापासून कोरोनाचा नव्या रुग्णाची संख्या कमी होत आहे.
तालुक्यात मंगळवारी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या केंद्रातील तपासणीत 93 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 259 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.दुसरीकडे दुर्देवाने 8 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.तालुक्यातील मुत्यू संख्या यामुळे 172 वर पोहचली आहे.तालुक्यातील एकूण बाधित आकडा 8898 वर पोहचला आहे.सध्या तालुक्यात 1554 रुग्ण उपचाराखाली आहेत.तर त्यापैंकी1359 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.

गेल्या पंधरवड्यात तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता.मुत्यू संख्याही वाढल्याने चिंता वाढली होती.जत शहरासह तालुक्यातील काही गावे काही बेपर्वार्ह नागरिकांच्या हलगर्जी पणामुळे हॉटस्पॉट बनली होती.कोरोनाच्या उद्रेकामुळे बाहेर पडतानाही भिती वाटत होती.अशी स्थिती गेल्या चार दिवसात बदलताना दिसत असून असेच रुग्ण कमी होत राहिले तर जूनच्या मध्यापर्यत स्थिती सामान्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मास्क,सँनिटायझर, सोशल डिस्टसिंग, लसीकरण वाढविल्यास कोरोना बाधित संख्या कमी होऊ शकते.त्याशिवाय तिसऱ्या लाटेचीही पुर्व तयारी करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.नागरिक,व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या वेळी झालेली लॉकडाऊन सारखी स्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
तालुक्यातील मंगळवारचे नवे रूग्ण;
