विलगीकरण विसरले,नव्या रुग्णाचा विस्फोट

0जत : जत‌ तालुक्यात गेल्या दोन महिन्यात कोरोना बाधित लोकांची संख्या दीडशे ते दोनशेेेेने वाढत आहे. ही संख्या कमी व्हावी असे प्रत्येकाला वाटते. पण, कमी करण्यासाठी स्वत:हून काहीच प्रयत्न होताना दिसत नाही. बाहेर फिरणाऱ्या लोकांना आपण दोष देतो पण आपणच रोज सकाळी बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. तसेच सरकारचेही झाले आहे. 


तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत,नागरिकांचा हालगर्जीपणा याला कारणीभूत दररोज ‌तालुक्यात पाच-सहा नागरिकांचा मुत्यू होत असतानाही सुधारणारा होताना दिसत नाही,त्यामुळे कोरोनाने ग्रामीण भाग विळख्यात घेतल्याचे चित्र आहे. आजूबाजूच्या ठिकाणी कोरोना अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले ते यशस्वी देखील झाले. 

Rate Card

आपली बाधित संख्याही कमी झाली पाहिजे असे प्रशासनाला वाटते पण त्यांनी जो विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला तो करण्याचा आपल्याकडून प्रयत्न होत नाही. मग, संख्या कशी कमी होणार. विशेष म्हणजे सरकारनेच विलगीकरणाचे धोरण न स्वीकारल्यामुळे बाधित संख्या वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.