मोठी दुर्घटना विहिर ढासळलली,५ जब बुडाले..

0
92

बोरामणी येथे एका विहिरीत पोहायला गेलेले 5 जण बुडाले असल्याची घटना समोर आली असून यामधील दोघांना सुखरुप बाहेर ककाढण्यात आले आहे. ग्रामस्थांसह अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात आज गुरुवारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कडक उन्हापासून वाचण्यासाठी गावातील जवळपास 5 ते 6 मुलं एका शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेले होते.
विहिरीत ही मुले पोहत असताना अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही मुले विहिरीत अडकली असल्याची माहिती मिळाली आहे.

बोरामणी येथे विहीर ढासळल्याने मोठी दुर्घटना

पोलीस, ग्रामस्थ तसेंच तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेवून बचाव कार्य केले. ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं आहे. विहिरीत पाणी अतिशय गढूळ असल्याने तळ दिसत नाही.

विहिरीत उतरलेली दोन मुले अद्यापही विहिरीतच अडकली आहेत,दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here