पाण्याच्या‌ मागणीसाठी कॉम्रेड थेट चाळीस फुटाच्या टाकीवर आंदोलनास बसले | डफळापूराच आनोखे आंदोलन

0
48

डफळापूर : डफळापूर येथील विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कॉ.हणमंत कोळी यांनी एकविरादेवी मंदिराजवळील पाणी पुरवठा टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन केले.जतचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर प्रंलबित प्रश्नासाठी विशेष बैठक बोलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर तीन तासानंतर कॉ.कोळी यांनी टाकीवरून खाली उतरत आंदोलन मागे घेतले.विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव,श्रीशैल बिरादार,पाणी पुरवठा शाखा अभियंता सुभाष साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीकडून गेले कित्येक दिवस गावकऱ्यांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा केला जात नाही.सध्या जो पाणी पुरवठा केला जातो ते पाणी हिरवेगार येत आहे.ते स्वच्छ पाणी मिळावे.डफळापूर बसस्थानकाचे अर्धवट काम तातडीने सुरू करावे.गावातील अंतर्गत रस्ते, गावातील गटारी दुरुस्ती करणे, बस स्थानक परिसरात असलेली मुतारी चालू करण्यात यावी.

या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी ग्रामसेवक,संरपच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,कॉ.मिना कोळी,पोपट शिंदे,संजय सुर्यवंशी, बसवराज स्वामी,बापू मासाळ, रवींद्र पाटील,अक्षय गुरव, बापू पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.मागण्याची वेळेत पुर्तता न झाल्यास ‌यापेक्षा मोठे आंदोलन करू,असा इशारा यावेळी कॉ.कोळी यांनी दिला आहे.

डफळापूर : येथील विविध मागण्यासाठी कॉ.हणमंत कोळी यांनी शोले टाईप आंदोलन केले.यावेळी सा.गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here