संख : करेवाडी(कोंतेवबोबलाद) येथे एका झोपडीवजा घरात छापा टाकत पोलीसांनी ९५ हजार २७० रूपयाचा ३ किलो ८१० ग्रँम गांजा जप्त केला.याप्रकरणी संजय जेट्याप्पा लोणार (वय ५०) याला ताब्यात घेतले आहे.संशयिताला जत न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुर्व भागातील करेवाडी (कोंतेबोबलाद) येथील संजय लोणार याने गांज्या विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती उमदी पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार सापळा लावत पोलीसांनी करेवाडी पासून दिड किलोमीटरवरील झोपडीवजा घरात छापा टाकत ९५ हजार २७० रूपयाचा ३ किलो ८१० ग्रँम गांजा जप्त केला आहे.सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
करेवाडी(कोंतेबोबलाद)येथे छापा टाकत एका संशयितासह गांज्या पोलीसांनी जप्त केला आहे.