जत : जत येथील पत्रकार नगरमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा संशयास्पद मुत्यृ झाल्याची घटना घडली असून विवाहितेच्या मुत्यृची चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी पोलीसाकडे केली आहे.प्रतिक्षा प्रकाश नागराळे (वय २२)असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,मयत विवाहिता प्रतिक्षा यांचा ४ वर्षापुर्वी जत नगरपालिकेत कर्मचारी असणारे प्रकाश नागराळे यांच्याशी विवाह झाला होता. पतीसह त्या जत येथील पत्रकारनगर येथे राहतात.आज शनिवारी दुपारी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते,मात्र तत्पुर्वीच विवाहिता प्रतिक्षा यांचा मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नातेवाईकांनी संशय व्यक्त करत मृत्तदेहाचे शवविच्छेदन जत ग्रामीण रुग्णालय येथे करण्याऐवजी मिरज सिव्हिल येथे करण्याची मागणी केल्यानंतर मृत्तदेह मिरज हलविण्यात आला आहे. दरम्यान विवाहितेच्या नातेवाईकाकडून पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला,मात्र पोलीसांनी मध्यस्थी करत पतीला ताब्यात घेतले आहे.