★ हभप तुकाराम बाबा महाराज यांचा अभिनव उपक्रम
★ संख येथील बाबा आश्रमात सप्ताह सुरू; २१ मे ला सांगता
जत : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती हे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले असले तरी आजही मोठया प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीने भविष्यात मानव जीवन संकटात येणार आहे. झाडे वाढली पाहिजेत जगली पाहिजेत यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज हे कायम आग्रही असतात.
विजयपूर येथील प.पु. सिध्देश्वर महास्वामीजी यांनी संख येथील बाबा आश्रमाला भेट दिली तेव्हा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या वृक्षाचे स्मरण दिन व श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या तृतीय वर्धापन दिन सोहळयानिमित्य अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्य हरिनाम सप्ताह साजरा करत अध्यात्माबरोबरच वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा संदेश हभप तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे. १५ मे पासून हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. येत्या २१ मे ला सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. २१ मे रोजी वृक्षाची पूजा करण्यात येणार आहे.
यावेळी अमृत पाटील जालाळ, शिवरात्र महाराज, खांडेकर महाराज, युवराज शिंदे महाराज, रामदास भोसले, शिव राठोड महाराज, राजू चौगुले, शिरसु कुंभार, निबोनी महाराज, चनाप्पा आवटी, बसु बागळी, पुंडलिक खोत, कृष्णा रजपूत संतोष कारागी, गंगेस्वामी ऋषी दोरकर, शंकूतला धोंडीबा भिसे, सुवर्णा राठोळ, बाळु आवटी, लिगुडा भोसले, संखचे ग्रामपंचायत सदस्य डाँ सागर शिवगोंडा पाटील, मनोहर पाटील, शिवलिंगेश्वर चंद्रशेखर बालगाव आदी उपस्थित होते.