संख : बेळोंडगी ता.जत येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गावात पाच दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
सध्या पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना भंटकती करावी लागत असून संबधित यंत्रणांनी तत्काळ टँकर मंजूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी सरपंच कल्पना बुरकुले यांनी दिला आहे.
तीन हजार लोकवस्तीच्या बेळोंडगीसाठी जूनी नळपाणी पुरवठा योजनेसह भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेतून सध्या पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र विहिरीतील पाणी स्ञोत अखेरीला आल्याने ५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान वाड्यवस्त्यांवरही पाणी टंचाई बिकट बनली आहे. ग्रामपंचायती कडूनही टँकर मागणीचा प्रस्ताव तालुका प्रशासनाला दिला आहे.पंचायत समिती व महसूल विभागाकडून समन्वय साधून टँकर तातडीने सुरू करावा,असेही बिरकुले यांनी म्हटले आहे.