जत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्या घटली | दरिकोणूर,उमराणीत चिंता वाढली
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली आहे.सोमवारी तालुक्यात 126 नवे रुग्ण आढळून आले आहेत.रविवारीही 124 रुग्ण आढळून आले होते.
दोन दिवसाच्या संख्येवरून तालुक्यातील कोरोना प्रभाव कमी होतानाचे दिलासादायक चित्र आहे.हॉटस्पॉट बनलेले जत शहर,अचनहळ्ळी,माडग्याळ,डफळापूर,जाड्डरबोबलाद येथेही रुग्ण संख्या घटल्याने चिंता काहीसी कमी झाली आहे.तालुक्यात 191 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या तालुक्यात 1977 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 1522 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.

आजचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण 126 (जत 12, अंकले 1,बाज 1,अचकनहळ्ळी 2,संख 2, उमदी 3,गुलगुंजनाळ 1, धावडवाडी 1,को-बोबलाद 3, वळसंग 1,शेगाव 1, मुंचडी 5, माडग्याळ 6, जा.बोबलाद 3,पाच्छापूर 3, उमराणी 10, गुळवंची 1,उटगी 1, सोन्याळ 4, येळवी 1,दरिकोणुर 10, बालगाव 1,
बसर्गी 1,डफळापूर 5, घोलेश्वर 1, बेवनुर 3, हिवरे 2, कोळेगिरी 2, गुगवाड 1, तिकोडी 3,बेळुंखी 2,व्हसपेठ 4,सिध्दनाथ 2, भिवर्गी 1,कोसारी 3,रेवनाळ 2, रामपुर 1, काराजनगी 2,मिरवाड 3, अंतराळ 3,शिंगणहळळी 1, गोधळेवाडी 1, करेवाडी को 1, गिरगाव 1, कुडनुर 1, वायफळ 1,करेवाडी ति 2, कोणबगी 2, हळळी 2)दरम्यान उमराणी,दरिकोणूर,येथे रुग्ण वाढीचा आलेख वाढला आहे.
