जत :आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. जतला आरटीओ कार्यालय मंजूर करून आणल्याबद्दल आ. गोपीचंद पडळकर यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन जतकरांच्यावतीने करण्यात आले होते. सत्कार सोहळयाच्या या कार्यक्रमात आ. पडळकर यांनी जतकरांनी दिलेल्या मताधिक्यामुळे राज्यात मान उंचावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे खमके नेतृत्व मिळाल्यामुळे जतकरांनी जतच्या विकासाची अजिबात चिंता करू नका, असे आवाहन करत २०२७ पर्यंत जत तालुका दुष्काळमुक्त करणार महणजे करणारच, हातातील कोयता हद्दपार करणार, असे आश्वासन देत येत्या वर्षभरात शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले. आ. पडळकर यांनी अभ्यासू व आक्रमक भाषण करत पुन्हा एकदा जतकरांची मने जिंकली. आ. पडळकर यांनी सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर विकासाची सूत्रे मांडत, जतकरांना आश्वासित करत आगामी निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले.
जतमधील धोरली वेस येथील नगर वाचनालय चौकात आ. पडळकर यांचा विविध सामाजिक संघटनेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी द फ्रेंड्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मदन बोर्गीकर, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पाटील, सुभाष गोब्बी, आदिवासी संघटनेचे बसवराज चव्हाण, अनिल पाटील, रविंद्र मानवर उपस्थित होते.
विकासकामांबाबत जतकरांना आश्वासित
आ. पडळकर महणाले, जतचा विकास हाच ध्यास घेवून आपण काम करत आहोत, जतमध्ये बंद पाडलेली मनरेगा योजना सुरू केली इतकेच नके तर राज्यातील पहिला रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्ट जतमध्ये सुरू होतोय. जत तालुका नंदादीप तालुका माणून शासनाने घोषणा केली आहे, भल्याभल्यांना जतला आरटीओ कार्यालय मंजूर होणार नाही वाटले होते.पण मुख्यमंत्र्यांनी जतला आरटीओ कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली. लवकरच जुन्या प्रांताधिकारी कार्यालयात तात्पुरते आरटीओ कार्यालय सुरू होईल. आरटीओ कार्यालयासाठी वायफळ रोडवरील ताड मळयासमोर वहा एकर जागा निश्चित केली आहे, तेथे लवकरच नव्या इमारतीत आरटीओ कार्यालय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत आ. पडळकर म्हणाले, जतच्या विस्तारित मौसाळ योजनेसाठी सध्या १२५ क्युसेकने आणले जाईल. यासाठी दोन पाईप टाकल्या आहेत. त्यातून केवळ २५० क्युसेक वेगाने पाणी जावू शकते तेव्हा या ठिकाणी आणखी दोन १२५ क्यूसेकच्या पाईप टाकाव्यात ही मागणी आपण लावून धरली आहे.बुधवारी जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक मेणार असल्याचे त्यांनी सांगितले,
जत पंचायत समितीला हवे तसे कार्यालय नाही. लवकरच पंचायत समितीची देखणी इमारत उभी करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला असल्याचे सांगून आ. पडळकर म्हणाले, जतवर कायम राजकीय मंडळींनी अन्याय केला आहे. येत्या पाच वर्षात मागील सर्व क्षेत्रातील ३० ते ४० वर्षाचा विकासाचा अनुशेष आपण भरून काढू.
जत शहराचा होणार कायापालट
२०१२ ला जत नगर परिषदेची स्थापना झाली पण आजही मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना बसायला इमारत नाही. पंचायत समिती इमारतीचरोबरच नगर परिषदेच्या नवीन इमारतीला मंजुरी मिळणार असल्याचे सांगून आ. पडळकर यांनी जत शहराचा आपण कशा पद्धतीने कायापालट करणार आहोत याचा लेखाजोखाच जतकरांपुढे ठेवला.
जतला लवकरच २४ तास पाणी मिळेल, शहरातील खुला जागेत बगीचा उभारला जाईल, भुयारी गटारीसाठी २५० कोटींचा प्रस्ताव असून तो मंजूर होईल, शहरात एमपीएससी अभ्यास केंद्र सुरू केले जातील, जादा एसटी मिळतील. श्री यलम्मा देवीच्या मंदिरासाठी शासनाकडून भरीव निधी दिला जाईल, नाट्यग्रह उभारले जाईल, अशी ग्वाही आ. पडळकर यांनी यावेळी दिली.जतला उभारणार नवीन प्रकल्प
जत तालुक्यात कुठे फिरायला जायचे महटले तर जावे कुठे, जतला कोणी आले तर जतमध्ये काय आहे असा सवाल उपस्थित होतो. येत्या वर्षभरात एक आगळ्या वेगळा लक्षवेधी नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. संपूर्ण राज्यात पुण्यानंतर जतमध्ये हा विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांची कानउघाडणी
जतचे प्रशासन गतिमान झाले आहे पण दोन अधिकारी सूचना देवूनही कामे करताना दिसत नाहीत. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आपण पाठीशी आहोत, पण जतकरांना जर कोणी लुटायला इथे आले असेल तर त्यानी त्यांचे गबाळ आताच गुंडाळावे, अशी जाहीर कानउघाडणी आ. पडळकर यांनी केली.
जयंतरावांना चिमटा
आ. गोपीचंद पडळकरांनी जतला आरटीओ कार्यालय मंजूर करून आणले, आपण मागील वीस वर्षापासून आरटीओ कार्यालयाची मागणी करतोय, तुम्ही मंत्री होता, पालकमंत्री होता पण इक्ले नाही असे प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांना लोक विचारत आहेत. त्यांना ते जमले नसल्याचे सांगत आ. पडळकर यांनी माजी मंत्री पाटील यांना चिमटा घेतला.