सिव्हील हॉस्पिटल सांगली येथील लिक्वीड ऑक्सिजन प्लँट सुरु ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0



सांगली : जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी 32 लाख रुपयाचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या पद्मभुषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, (सिव्हील हॉस्पिटल) सांगली येथील लिक्वीड ऑक्सिजन प्लँट सुरु झाला आहे. 

सदर ऑक्सिजन प्लँटची साठवण क्षमता 13 K.L. असल्याचे जिल्हाधिकारी      डॉ.अभिजीत चौधरी यांनी सांगितले.





रुग्णांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी पद्मभुषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, (सिव्हील हॉस्पिटल) सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समिती मधून 1 कोटी 32 लाख रुपये देण्यात आले.या निधीमधूनच लिक्वीड ऑक्सिजन प्लँट उभारला आहे. आज या लिक्वीड ऑक्सिजन प्लँटचे फजींग करुन कुलींग करण्यात आले आहे. 

Rate Card




या टँकमध्ये अंदाजे 12 मे.टन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यात आला आहे. सिव्हील हॉस्पिटल सांगलीसाठी प्रतिदिन अर्धा ते एक मे.टन इतकी रुग्णांच्या गरजेनुसार ऑक्सिजनची आवश्यता असते. त्यानुसार एकदा लिक्वीड ऑक्सिजन टँक पूर्ण क्षमतेने भरल्यास सिव्हील हॉस्पिटलला अंदाजे 17 ते 18 दिवस ऑक्सिजन पुरेल. सिव्हील हॉस्पिटल येथील लिक्वीड ऑक्सिजन प्लँटमुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ झाली असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.  



 


 


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.