जत शहरातील वृत्तपत्र विक्रेते दिनेश सांळुखे यांचे निधन
जत,संकेत टाइम्स : जत येथील वृत्तपत्र विक्रेते दिनेश सोपान सांळुखे,(वय 35)यांचे सोमवारी पहाटे दु:खद निधन झाले.गेल्या दहा वर्षापासून सांळुखे जत शहरात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत होते.तर दिवसभर जत येथील एका ट्रँक्टर कंपनीत सेल्समन म्हणून नोकरी करत होते.
गेल्या पाच दिवसापासून त्यांची प्रकृत्ती बिघडली होते.मिरज येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.अगदी तरूण वयात प्रचंड कष्ठ करणे अशी सांळुखे यांची जीवनशैली होती.आई,चार भाऊ,दोन बहिनी,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी अशा मोठ्या कुंटुंबियांत ते आंनदाने राहत होते.

मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते.अगदी चार दिवसात त्यांची प्रकृत्ती बिघडली,व त्यांत त्यांचे निधन झाले.मनमिळावू,सर्वाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तित्व असणाऱ्या दिनेश सांळुखे यांचे निधनाचे वृत्त धक्कादायक होते.आमदार विक्रमसिंह सांवत,माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह राजकीय,समाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना सोशल मिडियातून श्रंध्दाजली वाहत त्यांच्या कुंटुंबियांना या दु:खातून सावरण्याची ईश्वर चरणी प्रार्थना केली.
