दुष्काळी जतमध्ये रंगणार राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा

0
6

डॉ. रवींद्र आरळी, अण्णा भिसे यांची माहिती

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने तालुक्याच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा येत्या चार ते सहा जुलै दरम्यान होणार आहे. शहरातील बिरनाळ येथील तलावात १६ वी राज्यस्तरीय स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत ३० हुन अधिक संघ सहभागी होणार आहेत. १०० महिला, २०० पुरुष खेळाडू किमान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जत तालुक्यातील व शहरातील जनतेने या स्पर्धेचा साहसी थरार अनुभवायला जरूर यावे असे आवाहन भाजपचे नेते, भारत सिमेंट कार्पोरेशनचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, भाजपचे जत शहराध्यक्ष आण्णा भिसे यांनी

आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी परशुराम मोरे, किरण शिंदे, डॉ. प्रवीण वाघमोडे, अनिल पाटील, सोमनिंग बोरामणी उपस्थित होते. जतच्या दुष्काळाचा कलंक पुसून सर्वच क्षेत्रात जतची प्रगती व्हावी, विद्यार्थी व युवकांमध्ये साहस वाढावे यासाठी आ. गोपीचंद पडळकर यांनी पाठपुरावा करून जतमध्ये थेट राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा भरविण्याचा संकल्प केला. राज्य व जिल्हा पातळीवरील बोटिंग असोसिएशनशी संपर्क साधत या स्पर्धेचे जतमध्ये आयोजन करण्यात आले. डॉ. रवींद्र आरळी, आण्णा भिसे म्हणाले, जतकरांसाठी ही स्पर्धा नवीन आहे. जतच्या इतिहासात प्रथमच बोटिंगची स्पर्धा पार पडत आहे.

जतकरांनी विचारही केला नसेल की आपल्या जतमध्ये अशी स्पर्धा आयोजित केली जाईल पण प्रत्यक्षात आ. पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जतमध्ये या स्पर्धा भरविल्या जाणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन चार जुलै रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड उपस्थित राहणार आहेत. पाच जुलै रोजी सकाळी महिला व पुरुष गटात स्पर्धा रंगणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here