दुचाकीची समोरासमोर धडक,एकजण ठार | सोरडी येथील घटना

0
27



जत,संकेत टाइम्स : सोरडी ता.जत येथे दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने एकजण ठार झाला आहे.सिध्दू भैरू गावडे (वय 20) असे ठार झालेल्या युवकांचे नाव आहे.तर निलेश राजू वाकसे हा गंभीर झाला आहे.सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा भिषण अपघात घडला आहे.






अधिक माहिती अशी,चारचाकी वाहनाला ओहरटेक करताना निलेश वाकसे व सिध्दू गावडे यांच्या दुचाकीची समोरा समोर धडक झाली.त्यात सिध्दू गावडे हा गंभीर जखमी झाला होता.त्याला जत येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले.






तर दुसरा दुचाकी स्वार निलेश वाकसे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here