डफळापूर पंचायत समिती गणातून अशोक सवदे यांना उमेदवारी द्यावी ; – माजी सरपंच कलावती कांबळे यांची ठाम मागणी

0
96

जत : डफळापूर पंचायत समिती गणात कृषी क्षेत्रातील अभ्यासू, कार्यक्षम व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेल्या अशोक सवदे यांच्या इच्छुक उमेदवारीला मतदारांमधून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेती, समाजकार्य आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व भरीव कामामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा विश्वासार्ह, विकासाभिमुख आणि समस्यांवर थेट उपाय करणाऱ्या नेत्याची बनली आहे.

आगामी पंचायत समिती निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली अशोक सवदे यांनी सक्रियपणे निवडणूक लढवावी व त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी मिरवाड येथील माजी लोकनियुक्त सरपंच कलावती कांबळे यांनी केली आहे. डफळापूर पंचायत समिती गणातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व गावांमधून सवदे यांना व्यापक पाठिंबा मिळत असून, त्यांच्या उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी सरपंच कलावती कांबळे म्हणाल्या की, डफळापूर पंचायत समिती गणातील विविध मूलभूत व दीर्घकालीन प्रश्नांवर अशोक सवदे यांनी नेहमीच गांभीर्याने लक्ष दिले आहे. रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात होणारी वाहतुकीची अडचण, ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय अडचणी, निधीअभावी रखडलेली विकासकामे या सर्व बाबींमध्ये त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून तोडगे काढण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य बाजारपेठेचा नियोजनबद्ध विकास, व्यापाऱ्यांसाठी मूलभूत सुविधा, तसेच गावोगावी पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नागरिकांच्या विशेष लक्षात राहिले आहेत.

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, ठिबक सिंचन, सौरऊर्जा, पीकविमा योजना आणि विविध शासकीय अनुदान योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सवदे यांनी पुढाकार घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याबरोबरच शासकीय मदतीसाठी त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधला आहे. बेघर व गरजू कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

युवक व विद्यार्थ्यांसाठीही अशोक सवदे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. पदवीधर आणि सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिका व लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सातत्याने मागणी लावून धरली आहे. बेरोजगार युवकांच्या नोकरीविषयक अडचणी, मार्गदर्शन, समुपदेशन तसेच महिलांच्या मूलभूत प्रश्नांबाबत ते नेहमीच संवेदनशील राहिले आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जनजागृती, संवाद आणि मदतीचे उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर दिला आहे.

सामान्य कुटुंबातून पुढे आलेला, स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेला युवा नेता म्हणून अशोक सवदे यांना सर्व स्तरांतून पसंती मिळत आहे. डफळापूर पंचायत समिती गणातील सर्व गावांतून त्यांना एकमुखी पाठिंबा मिळत असून, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनाही त्यांच्या उमेदवारीच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

डफळापूर गणाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू व जनतेशी थेट संपर्क असलेले नेतृत्व आवश्यक असून, अशोक सवदे हे त्या निकषांवर पूर्णपणे उतरतात. त्यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत त्यांना उमेदवारी देणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी सरपंच कलावती कांबळे यांनी व्यक्त केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here