सांगली, दि. २६ : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी आमदार सुहास बाबर आणि पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार सुहास बाबर, तानाजीराव पाटील आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत सांगली-सातारा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि तानाजीराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्वी दिलेल्या शब्दाची आठवण करून देत, तानाजीराव पाटील यांनी जिल्ह्यात संघटना बांधणी आणि पक्षवाढीसाठी मोठे योगदान दिल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी आग्रही मागणी केली.
फोटो ओळ : मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन तानाजीराव पाटील यांच्या उमेदवारीची मागणी करताना आमदार सुहास बाबर व कार्यकर्ते.




