— सदाभाऊ खोत
मोहोळ : यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला ७ हजार रुपये दर मिळाल्याशिवाय ऊस तोडणी सुरू करू देणार नाही, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला. कुरुळ येथे झालेल्या ऊस व इथेनॉल परिषदेत ते बोलत होते.
साखरेच्या दरात वाढ होत असतानाही शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याचा आरोप खोत यांनी केला. ऊसदरासाठी विधानसभेत लढा उभारण्याचे आश्वासन देत गावोगावी आंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
साखर कारखाने, सूतगिरण्या व सहकारी बँकांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.




