श्रीपती शुगरकडून एक लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण

0
0

डफळापूर : श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड, डफळापूर या साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या चालू गाळप हंगामात एक लाख टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

कारखान्याने यंदाच्या हंगामात गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. एक लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण झाल्याने कारखाना प्रशासन, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

या यशामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य, तोडणी व वाहतूक यंत्रणेचे नियोजन तसेच कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

आगामी काळातही अधिकाधिक ऊस गाळप करून हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील आहे. या यशाबद्दल कारखान्याच्या वतीने सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक कंत्राटदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here