डफळापूर परिसरातील गावांचा सर्व्हे होणार ; दिग्विजय चव्हाण

0



डफळापूर, वार्ताहर: डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघातील ‌गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे कुडणूरच्या धर्तीवर मतदार संघातील सर्व गावाचा डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून सर्व्हे होणार आहे, अशी माहिती पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी दिली.







चव्हाण म्हणाले,जत पश्चिम भागातील डफळापूर सह बाज,बेळूंखी,अंकले,डोर्ली,हिवरे,धावडवाडी,वाषाण,कंठी खलाटी,जिरग्याळ,मिरवाड,शिंगणापूर,कुडणूर या गावात सातत्याने कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यात गावातील नागरिक अशिक्षित व अज्ञान पणामुळे त्यांच्याकडून कोरोना सारखे आजार अंगावर काढण्याचा प्रकार होत‌ आहे.त्यामुळे धोका वाढला आहे.




Rate Card



त्या पार्श्वभूमीवर डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चौथे यांच्याशी चव्हाण यांनी चर्चा केली.रुग्ण संख्या कमी करण्यासाठी नियोजन करण्याचे यावेळी ठरले असून केंद्राचे एक पथक दररोज एका गावात सर्व्हे करणार आहे.पथक

गावातील नागरिकांची तपासणी करेल.काही जणांना कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्यांची अँन्टिजन टेस्ट करतील, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास तात्काळ औषधोउपचार करून त्याना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येईल,प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा वर्कर्स त्यांच्यावर लक्ष ठेवून राहितील.कुडणूर येथे सहा नागरिकांचा संशयास्पद मुत्यू झाल्यानंतर संपूर्ण गावाची कोरोना तपासणी केली होती.






त्यामुळे तेथील कोरोना संसर्ग रोकणे शक्य झाले होते.त्या धर्तीवर आता सर्व गावांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्याशिवाय डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून पाच ऑक्सीजन बेडची सोय करण्यात आली आहे, ऑक्सीजन ही उपलब्ध करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे हालगर्जीपणा न करता संशयास्पद लक्षण वाटल्यास डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी करून घ्यावी,कोरोना हा संसर्ग वाढविणारा आजार आहे.कोणीही अंगावर काढू नये,त्याशिवाय विनाकारण घराबाहेर फिरू नये,मास्क,सँनिटायझरचा‌ काटेकोर वापर करावा,असेही आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.