जनता कर्प्यू जतच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद
शेगाव,संकेत टाइम्स : जिल्ह्यात वाढलेला कोरोना संसर्ग रोकण्यासाठी पुकारलेल्या जनता कर्प्यूला जत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रतिसाद मिळाला.तालुक्यातील शेगाव,बनाळी,माडग्याळ, उमदी,संख,कोतेंबोबलदा,दरिबडची,
तालुक्यातील ग्रामीण भागाला कोरोनाने विळखा घातला आहे.दररोज नवे कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावला आहे.

त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात मेडिकल,दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय नागरिकांनी घरात राहणेच पंसत केले आहे.त्यामुळे कायम गजबलेली तालुक्यातील प्रमुख गावे निर्मनुष्य झाली आहेत.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी पुर्ण सहयोग दिल्याचे चित्र आहे. जत,उमदी पोलीस ठाणे,महसूल विभाग,स्थानिक ग्रामपंचायती कडून कडक अमलंबजावणी करण्यात येत आहे.
शेगाव ता.जत येथे बंदमुळे प्रमुख बाजार पेठ निर्मनुष्य झाली आहे.