आता दोन हजार रूपयात होणार एचआरटीसी टेस्ट | जतच्या कमल मेडिकल फांऊडेशनची सामाजिक बांधिलकी

0जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील नागरिकांना जत येथील जत सिटी स्कँन व डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शरिराच्या कोणत्याही भागाचे 2 हजार रूपयात स्कँनिग करण्यात येणार आहे.जत सीटी स्कँन सेंटरच्या विस्तारित डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण मंगळवारी माजी आमदार तथा कमल मेडिकल फांऊडेशनचे अध्यक्ष उमाजीराव सनमडीकर व सचिव कमल सनमडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ.कैलास सनमडीकर,डॉ.वैशाली सनमडीकर,अनुष्क सनमडीकर,अपुर्वा सनमडीकर उपस्थित होते.जत येथील उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशनचे जत येथे सीटी स्कँन सेंटर सुरू आहे.त्याचे विस्तारिकरण करत नव्याने 300 एम ए डिजीटल एक्स-रे मशीन व जीई कंपनीचे ब्राईट स्पीड मशीन बसविण्यात आले आहे.या सेंटर मध्ये सर्व प्रकारचे आजारांवरील स्कँनिंग करता येणार आहेत. फाऊंडेशन ही संस्था वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात 2004 पासून कार्यरत आहे.वैद्यकीय,शैक्षणिक, सामजिक क्षेत्रात तालुक्याचा नावलौकिक करत आहे.गेल्या 16 वर्षापासून या फांऊडेशनचे डॉ.कैलास सनमडीकर हे सामाजिक बांधिलकी जपत कार्यभार हाकत आहेत.जत तालुक्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अडचणीतील नागरिकांना मदत व्हावी,यासाठी त्यांच्या जत सीटी स्कँन सेंटरचे विस्तारीकरण करत अत्याधुनिक सीटी स्कँन मशीन परदेशातून आयात करून नव्याने सुरु करण्यात आले आहे. या जत सीटी स्कँन सेंटरच्या‌ माध्यमातून सर्व प्रकारचे स्कँनिंग मेंदू रोग, छाती व पोटाचे विकार,एचआरटीसी टेस्ट,तसेच सर्व प्रकारच्या अँनजिऑग्राफी करता येणार आहे.सर्व प्रकारचे एक्स-रे यांची तपासणी तज्ञ रेडिओलॉजिस्ट मार्फत करत,रिपोर्टिंग करण्यात येणार आहेत. या सेंटरमधून 24 तास सेवा चालू राहणार आहे. यासाठी तीन शिफ्टमध्ये तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या मशीनसाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र टीसी बसविण्यात आला आहे.त्याचबरोबर 125 के.व्ही.चे जनरेटर बकअप बसविण्यात आलेले आहे,त्यामुळे विज पुरवठा खंडीत झाला तरीही रुग्णांना सेवा उपलब्ध असणार आहे.
Rate Card
सध्याची कोरोनाची महामारी लक्षात घेता उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशन या संस्थेने प्रत्येक स्कँनसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून केवळ दोन हजार रुपय दर ठेवला आहे.याचा फायदा ग्रामीण भागातील अडचणीत असलेल्या रुग्णांना होणार आहे.नविन सीटी स्कँन मशीनसाठी सप्लायर दीपक रॉय (गाजियाबाद), बाळू शिंदे, सिव्हिल सर्जन साळुंखे, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील, जत ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक मोहिते, टेक्नीशियन अमजद मकानदार, विनोद कुंभार,इंजि.श्रीकांत पाटील, कंत्राटदार नागमोती, सचिन कोळी, सचिन जाधव,वीज कंपनीचे जत व कवठेमहांकाळ येथील अधिकारी यांचे सहकार्य लाभले, असल्याचे उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कैलास सनमडीकर व सचिवा डॉ.सौ.वैशाली सनमडीकर यांनी सांगितले.

जतच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्यायजत शहराला मिरज नंतर वैद्यकीय वारसा आहे,येथे अनेक मोठे दवाखाने कार्यरत आहेत.डॉ.कैलास सनमडीकर हेही गेल्या 16 वर्षापासून कमल आर्थोपेडिक हॉस्पिटल चालवित आहेत.त्यांनी नव्याने या अत्याधुनिक सीस्टी स्कँन व डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून जतच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय लिहला आहे.जत येथील जत सिटी स्कँन व डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.