डफळापूर येथे विज पडून रेड्याचा मुत्यू

0



डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील शेतकरी गुंडा तिपाण्णा परीट यांच्या झाडाखाली बांधलेल्या रेड्याच्या अंगावर

विज पडल्याने मुत्यू होऊन 65 हजाराचे नुकसान झाले.




Rate Card




परिसरात गुरूवारी मेघर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.गेल्या तीन दिवसापासून अवकाळीचा फटका बसत आहे.गुरूवारी सांयकाळी विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने द्राक्ष,आंबा बागायतदाराचे मोठे नुकसान केले.जत तालुक्यात वेधशाळेने जाहीर केल्याप्रमाणे गेल्या चार दिवसापासून सलग वादळी पावसाचा तडाखा बसत आहे.



यात वादळी वारे,गारा,आक्राळ,विक्राळ विजेमुळे मोठी हानी होत आहे. शासनाने नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.