डफळापूर,बाजला कोरोनाचा विळखा | गुरूवारी आढळले तब्बल 25 रुग्ण ; परिस्थिती आणखीन बिघडणार
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील डफळापूर, बाजमध्ये गुरूवारी कोरोनाचा विस्फोट झाला. दोन्ही गावात मिळून तब्बल 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या तीन दिवसात घेतलेल्या आर.टी.पी.सी.आर तपासणीत हे रुग्ण आढळून आले आहेत.
डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासण्यात गती आणण्यात आली आहे.दररोज लक्षणे असलेल्या रुग्णाच्या अँन्टीजन व अल्प लक्षणे असलेल्या रुग्णाच्या
टी.पी.सी.आर तपासण्या करण्यात येत आहेत.
जत नंतर डफळापूर मध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आतापर्यत 50 च्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.व्यापारी,
नागरिकाचा हालगर्जीपणा डफळापूर करावर संकट आणणारा ठरला असून डफळापूर मध्ये कोरोनाचा कम्यूनिटी प्रसार झाला असून दररोज नवे रुग्ण आढळून येत आहेत.

भविष्यात बेपर्वाही बंद न झाल्यास डफळापूर पुर्णत: लॉकडाऊन करण्याची वेळ येणार आहे.बुधवार पर्यत केलेल्या आर टी पी सी आर तपासणीत डफळापूर मधील तब्बल 17 तर बाजमधील 8 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामुुुुळेेे जत पश्चिम भागात कोरोनाच्या विळख्यात आला आहे.
गुरूवारीही अँन्टीजन व आर टी पी सी आर तपासण्या करण्यात आल्या आहेत.आर टी पी सी आर तपासणीचे अहवाल प्रलंबीत आहेत.त्यामुळे कोरोनाचा विळखा अजूनही आवळणार हे निश्चित आहे.
दरम्यान गत वेळच्या कोरोना लाटेत नागरिक,व्यापाऱ्यांनी काळजी घेतली होती.त्यामुळे कोरोनाचा प्रभाव मर्यादित राहिला होता.आता कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असतानाही बेपर्वाही धोक्याकडे नेहत आहे.
वेळेत सावध न झाल्यास घरातून बाहेर पडणेही मुश्किल होईल इथपर्यत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे