जत तालुक्यात रुग्ण संख्येत शेकड्याने वाढ ; प्रशासन गंभीर नाही,नगरपरिषदही सुस्तावली

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असताना प्रशासन मात्र कोरोना निर्बंधांकडे दुर्लक्ष करित आहे.त्यामुळे जत तालुक्यातील प्रशासकिय यंत्रणा कोमात तर कोरोना जोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,असा आरोप रिपाइचे‌ जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केला आहे.


तालुक्यात आजपर्यंतचे एकूण कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण एकूण संख्या 3012 वर पोहचली आहे.यापैकी 2460 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर दुर्देव्याने 83 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तालुक्यात 469 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 362 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. ते अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी फिरत‌ असल्याने धोका बळावला आहे.सातत्याने रूग्णवाढ ही चिंताजनक अशी असून कोरोना रोखण्यासाठी तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.


जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर प्रशासनाने फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या सुचना देऊनही दुपारी 11 नंतरही जत येथील विविध व्यवसाईक हे प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता आपली दुकाने अर्धे शटर उघडून ग्राहकांना माल देत आहेत. कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडविणारेवर कोणत्याही प्रकारे कारवाई करताना पोलीस दिसत नाहीत. केवळ वाहनात बसून तोंडाला मास्क न लावता शहरातून विनाकारण दुचाकीवर फिरणारे व ट्रीपल सिट बसून पोलीसा समोरच कायदा पायदळी तुडविणारे हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.दुसरीकडे नगरपरिषदेचा कारभार तर आंधळ दळतय आणी कुत्र पिठ खातय असा झाला आहे.नगरपरिषदेला कोरोना विषयी काहीही गांभीर्य दिसून येत नाही. Rate Cardशहरातील व्यवसाईक व नागरिक हे कोरोनाचे नियम पायदळी तुडवित असताना ही नगरपरिषदेची कारवाई करण्याची भूमिका असायला पाहिजे होती, परंतु नगरपरिषद ही बघ्याची भूमिका घेत आहेत.या नगरपरिषदेला कोणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी देता का ? मुख्याधिकारी ? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 


जतचा अतिरिक्त कार्यभार असलेले संखचे‌ अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांनी सोमवारी धाडस करत जत व डफळापुर येथील नऊ अत्यावश्यक सेवेत नसणारी व कोरोना नियमांचे पालन न करणारी दुकाने सील करण्याची कारवाई केली आहे.अशा कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे.जत ग्रामीण रूग्णालयात असलेल्या कोविड विभागात तर सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. येथील कर्मचारी वर्ग हा कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.ऑक्सीजन बेडची व व्हेंटीलेटरची व्यवस्था अपूरी अशी आहे.


ऑक्सीजन बेड व व्हेंटीलेटरची व्यवस्था पहाणारे कर्मचारी प्रशिक्षीत नाहीत. रेमडेसिवर इंजेक्शनचा शिल्लक स्टाॅक नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे रेमडेसिवर संदर्भात मागणी करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही,असा आरोप संजय कांबळे यांनी केला आहे. जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात कोरोना संदर्भात त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ही कांबळे यांनी दिला आहे.

दुकाने सील,नगरपरिषद करते काय?

जत‌ शहरात नियम मोडताना दुकाने सील करण्याची कारवाई तहसीलदार‌ म्हेत्रे यांना करावी लागते,मग नगरपरिषद करते काय,त्यांच्या अधिकाऱ्यांना कोरोना काळात नेमके कोणते काम दिले आहे.गलेलठ्ठ पगार घेऊन खुर्च्या उबविण्याचे काम कार्यालयात बसून सुरू आहे काय ?पदाधिकारी करतात काय ? नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आतातरी बंद करा,असा संतप्त मागणी नागरिकांनी केली आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.