जतेत शिक्षक भवन बांधा, शिक्षक संघ(शि.द.)ची मागणी

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मोठ्या संख्येने  शिक्षक वर्ग कार्यरत आहे.त्या सर्व शिक्षकांना विविध कामा निमित्त जत शहरात यावे लागत आहेत.त्याकाळात त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र अशी हक्काची जागा कोठेही नाही.त्यामुळे त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांना एकत्र सोय व्हावी,यासाठी जत नगरपरिषद हद्दीत एक शिक्षण भवन बांधून द्यावे,अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघ(शि.द.)गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसे निवेदन त्यांनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे कि,जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक,माध्यमिक शाळा आहेत.तेथे सुमारे 2,500 हजार शिक्षक कार्यरत आहेत.या शिक्षकांना विविध प्रशासकीय कामासाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या जत येथे यावे लागत असते,मात्र या शिक्षकांना एकत्र बसण्यासाठी हक्काची अशी जागा नाही.त्यामुळे अनेकवेळा बैठका,प्रशासकीय शिबिरे,चर्चासत्रे,शैक्षणिक कामकाम,विविध कार्यक्रम घेण्यात येतात.त्यावेळी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे जत शहराची मातृसंस्था असलेल्या नगरपरिषदेकडून शिक्षकांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशस्त असे शिक्षक भवन बांधून द्यावे,अशी मागणी करण्यात आली.

Rate Card

दरम्यान मागणीचा विचार करून शिक्षक भविष्यातील पिडीचे गुरू असून त्यांच्या सोयीसाठी आम्ही कठीबंध्द आहोत.जत नगरपरिषदेकडून शिक्षकांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी,


यासाठी भवन बांधण्यासाठी मी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करेन,असे आश्वासन मुख्याधिकारी शुंभागी बन्नेनवर यांनी यावेळी शिक्षकांच्या शिष्टमंडळास दिली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जैनुद्दिन नदाफ,तालुका कोषाध्यक्ष उत्तम लेंगरे,संघटक विष्णू ठाकरे,सुदाम करहाळे आदी मान्यवर उपस्थित होते.जत शहरात शिक्षक भवन बांधावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.