पोटच्या मुलांनी झिडकारले,रुग्णवाहिका चालकाने केले अंत्यसंस्कार | वृध्द महिलेच्या मुत्यूने हळहळली माणूसकी
जत,संकेत टाइम्स : पोटच्या मुलांनी
मुत्यूनंतर झिडकारले,रुग्णवाहि
पंरतू त्या वृद्ध महिलेसोबत रुग्णवाहिकेत बसण्यास मुलगा,नातेवाईक तयार होईनात,मात्र अशातच आयुष्यभर साथ दिलेल्या पत्नीसाठी व्यवस्थित चालताही येत नसलेले वयोवृद्ध पती रुग्णवाहिकेत बसले.दुर्देवाने सांगलीच्या आसपास पोहचताच त्या वृद्ध महिलेचे निधन झाले.रुग्णवाहिका चालक योगेश मोटे व डॉ.राहुल पवार यांनी त्यांच्या मुलांमुलींना फोन करून या घटनेची माहिती दिली.
तुमच्या आईचे निधन झाले आहे, असे सांगण्यात आल्यानंतर आम्ही काय करू,आईच्या मृत्तदेहाचे तुमचं तुम्ही तिकडं काय तर करा असे सांगण्यात आले.त्या वयोवृद्ध पतीने बाबा पोर नसली तर बर झालं असत,असे म्हणत माझी परिस्थिती नसल्याने माझ्या पत्नीवर काहीही कर पण तूच अंत्यसंस्कार कर असे डोळ्यात पाणी आणत रुग्णवाहिका चालकाला सांगितले.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले चालक मोटे यांनी तात्काळ जतमधील आपल्या मित्रांना यांची माहिती देत स्मशानभूमीत तयारी करण्याची सुचना दिली.अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य घेऊन या मी मृतदेह घेऊन येत आहे असे सांगितले.
मोटे रुग्णवाहिका घेऊन स्मशान भूमीत येताच चालक मोटे,डॉक्टर पवार व त्यांच्या सोबतचे मित्र अमोल कुलकर्णी, निलेश माने,अमित बिज्जरगी,माजी नगरसेवक महादेव कोळी,परशुराम मोरे,लक्ष्मण एडके, पत्रकार भागवत काटकर, हरीश शेटे,प्रमोद ऐवळे व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जत येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

दरम्यान आईच्या मुत्यूनंतरही जवळ न आलेल्या मुलां मुलीविषयी संताप व्यक्त होत आहे.जत तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून जत शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट शहर बनले आहे.दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत असून 108 रुग्णवाहिका हे गोरगरीब जनतेसाठी जीवनदाहीनी बनली आहे.रुग्णवाहिकेचे चालक योगेश मोटे,भिमराव बंडगर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून रूग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत.
त्याच्या सोबत डॉ.राहुल पवार हे रुग्णांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात.कोरोनामुळे माणसातील माणुसकी हारवत चाललेली आहे.जन्म दिलेले मुले ही आपल्या आई वडीलपेक्षा आपला जीव कसा सुरक्षित राहील याला महत्व देत,अंत्यसंस्कार सारखे पवित्र कार्यही विसरत आहेत,है दुर्देव्य म्हणावे लागेल.
जत शहरातील मृत्त वृध्द महिलेवर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.