सांगली जिल्ह्यात कोरोना विस्फोट कायम;14 जणाचा मुत्यू

0सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात 962 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दिवसभरात 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे.शनिवारी 67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत.राज्यात 419 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6लाख 47 हजार 933 अँक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के  झाले आहे.सांगली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. आज शनिवार ता.17 रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील 962 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सांगली जिल्ह्यात सद्या प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. सुमारे एक हजारच्या आसपास दररोज नवीन रुग्णांची वाढ होत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी देखील नागरिकांनी काही दिवस घरात राहूनच कोरोना पासून बचाव करावा असे आवाहन केले आहे. 


Rate Card

शनिवारी सांगली जिल्ह्यातील 14 जणांना कोरोना मुळे प्राण गमवावा लागला आहे. तर 363 जणांनी आज कोरोना वर मात केली आहे. आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी 109, जत 38, कडेगाव 128, कवठेमंहकाळ 36, खानापूर 111, मिरज 80, पलूस 28, शिराळा 24, तासगाव 67, वाळवा 142 तसेच सांगली शहर 134 आणि मिरज शहर 65 असा सांगली जिल्ह्यातील 962 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या 6 हजार 610 रुग्ण उपचाराखाली आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.रोज 

कोरोना ग्रस्ताची वाढ होत असल्यामुळे राज्यात सध्या चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवस परिस्थिती पाहतील. त्यानंतर लॉकडाऊनबाबत योग्य तो निर्णय घेतील, असं परब यांनी म्हटलंय. shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.