जत शहरातील बंद घरातून दिड लाखाचे दागिणे लंपास
जत,संकेत टाइम्स : कस्तूराबाई कृष्णा माने रा.रामराव नगर जत, याच्याघरातून अज्ञात चोरट्यांनी दीड लाखाचे सोन्याचे दागिणे पळवून नेहल्याची घटना सकाळी 11.30 सुमारास घडली आहे.

फिर्यादी कस्तूराबाई माने ह्या घरास कडी लावून बाथरूमला गेल्या असताना घराची कडी काढून चोरट्यानी कपाटातील सुमारे दिड लाख रूपयाचे सोन्याचे दागिणे पळवून नेहले आहेत.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.