जत पोलीसाकडून अखेर कडक नाकाबंदी | विनाकारण,विना मास्क नागरिकांना दणका ; लाखावर दंड वसूल

0जत,संकेत टाइम्स : जत शहरासह तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झालेला असतानाही जतचे पोलीसाकडून अपेक्षीत कारवाई होत नसल्याची ओरड सुरू होती.कोरोना निर्बंध कडक करण्याची मोठी जबाबदारी जत पोलीसावर असतानाही पोलीस पथके ठाण्याबाहेर पडली नव्हती.अखेर सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शुक्रवारच्या जत‌ येथील बैठकीत कोरोना संसर्ग रोकण्यासाठी सर्व विभागानी सतर्क होण्याच्या कडक सुचना दिल्यानंतर अखेर जत पोलीसाकडून शनिवार पासून कारवाई कडक करण्यात आली आहे. शनिवारी काही काळ शहरातील प्रमुख चौक असलेल्या महाराणा प्रताप चौकात नाकाबंदी करत तब्बल 100 वर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढत असल्याने धोकादायक स्थिती बनली आहे.कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.


मात्र जत‌ तालुक्यात नागरिक बेपर्वार्ह असल्याने कोरोनाचा कहर वाढत‌ आहे.परिणामी अशा बेफिकीर नागरिकांना पोलीसांच्या दंडुकाचा धाक गरजेचा आहे.तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याकडून कडक कारवाई सुरू असताना जत पोलीस ठाण्याचे अधिकारी अपेक्षित गर्दी रोकण्यात अपयशी ठरत होते.मोठे शहर असलेल्या जत शहरातील गर्दी गेल्या काही दिवसापासून हाटण्याचे नाव घेत नाही.निर्बंध पायदळी तुडवत,अर्धे‌ शटर,फळाचे‌ गाडे,भाजी विक्रेते बेधडक संसर्ग वाढविण्याचे काम करत असल्याचे आरोप होत आहेत. 


यावर गतवेळी प्रमाणे रामदास शेळके सारख्या अधिकाऱ्यां सारखी कारवाईची गरज‌ निर्माण झाली आहे.गर्दी रोकली तरचं कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य‌ होणार आहे.अन्यथा मोठा विस्फोट निश्चित आहे.जत शहरातील कोरोना रोकण्यासाठी पोलीसा बरोबर नगरपरिषदेने काम करण्याची गरज आहे.

Rate Card
अपडेट बातम्यासाठी खालील ग्रुप मध्ये सामील व्हा. दरम्यान पोलीसांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दररोज दंडाचा‌ दणका देण्याची कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

शनिवारी अखेर जत पोलीसांनी कारवाईचा बेफीकीर नागरिकांना दणका दिला. मुख्य चौकात मोठ्या फौजफाट्यासह नाकाबंदी करत सुमारे 100 दुचाकी,विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल लाखभर दंड वसूल केला आहे. पो.नि.उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक यशवंत घोडके,सचिन जवजांळ,उमर फकीर,विठ्ठल तेली,महादेव मडसनाळ,संतोष खांडेकर,जयश्री भोये,विकास कांबळे,संतोष बनसोडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.


कारवाईत सातत्य ठेवा

दरम्यान शनिवारी पोलीसाच्या कारवाईने विनाकारण,विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना चाफ बसला होता.अशाच पध्दतीने आरळी कॉर्नर, बिळूर चौक,हनुमान मंदिर,महाराणा प्रताप चौक,शिवाजी चौक,शेगाव चौक येथे‌ दररोज नाकाबंदी करण्याची मागणी होत आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.