जतेत शनिवारी कडकडीत बंद | व्यापारी,नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद ; गजबजलेले रस्ते,चौक निर्मनुष्य
जत,संंकेेेत टाइम्स : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर जत शहरात शनिवार कडकडीत बंद पाळण्यात आला.शहरातील कायम गजबजलेले रस्ते,चौक निर्मनुष्य झाले होते.वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार पहिले दोन तीन दिवस जत शहरातील व्यापारी,नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत होता.मात्र शनिवारी कडक बंद पाळण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे,त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.जतेत कोरोना रुग्णांच्या संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जतेत कडक निर्बंध व लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात मेडिकल,दवाखाने,
एमआयडीसी वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहेत.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात आले आहेत.

शहरातील व्यापारी,नागरिकांनी असाच प्रतिसाद दिल्यास कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.पुढील काही दिवस नागरिकांनी विना कारण घराबाहेर पडू नये,व्यापाऱ्यांनी काही दिवस सहकार्य करावे,असे आवाहनही केले आहे.
जत शहरात शनिवार कायम गजबजलेला नगरपरिषद रस्ता निर्मनुष्य बनला होता.