श्रीपती शुगर कारखान्यात स्थानिकांना रोजगार द्यावा | कॉ.हणमंत कोळी यांचे मंत्री विश्वजीत कदम यांना निवेदन

0जत,संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथे सुरू होत असलेल्या श्रीपती शुगर साखर कारखान्यात सध्या स्थानिक बेरोजगार तरूणांना डावलण्यात आले आहे,गत विधानसभा निवडणूकीत आमदार विक्रमसिंह सांवत यांनी 

कारखान्या उभारून स्थानिक बेरोजगार तरूणांच्या‌ हाताला काम देण्यात येईल,असे आश्वासन दिले होते.आता त्या आश्वासनाची पुर्तता करण्याची वेळ आली आहे,स्थानिक तरूणांना कारखान्यातील सुरू होणाऱ्या विविध विभागात नोकरी द्यावी, अशी मागणी कॉ.हंणमत‌ कोळी यांनी केली आहे.


त्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम हे कारखाना स्थंळावर आले असताना तशा मागणीचे निवेदन दिले.

कोळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,डफळापूर, कुडणूर शिंगणापूर,जिरग्याळ,शेळकेवाडी,कर्नाटकातील अंनतपूर,खिळेगाव अशा अनेक गावांच्या मध्यवर्ती हा श्रीपती शुगर साखर कारखाना उभारत‌ आहे.


त्यामुळे या परिसरातील बेरोजगार तरूणांना आशेचा किरण तयार झाला आहे.कारखाना उभारणीचे काम सध्या गतीने सुरू आहे. मात्र अद्यापही अपवाद वगळता स्थानिक तरूणांना नोकरी देण्यात आलेली नाही.

Rate Card

विधानसभा निवडणूकी पुर्व प्रचार सभात आमदार विक्रमसिंह सांवत व कॉग्रेस नेत्यांनी या कारखान्यामुळे या भागातील बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्यात येईल,असे आश्वासन दिले होते.त्यामुळे या भागातील तरूणांनी आ.सावंत यांना चांगली साथ दिली आहे.


आता त्या आश्वासना नुसार नोकरी देण्यात आ.सावंत यांनी पुढाकार घ्यावा.

या कारखान्यातील बॉयलर मधून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे काही शेतकरी बेरोजगार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अशा शेतकऱ्यांच्या मुलासह स्थानिक तरूणांना जास्तीत जास्त प्रमाणात नोकरी द्यावी,अन्यथा कारखान्यासमोर या तरूणांना घेऊन बेमुदत उपोषणास बसू असा इशाराही कॉ.हणमंत कोळी यांनी दिला आहे.

जत कारखान्यात स्थानिक तरूणांना नोकरी द्यावी यामागणीचे मंत्री विश्वजीत कदम यांना निवेदन देताना कॉ.हणमंत कोळी

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.