कोसारीत दारूअड्ड्यावर जत पोलीसाची कारवाई | ठाण्याच्या अंगणात सुरू असलेल्या मटका,जुगार,तीनपानी क्लबला मात्र बगल

0जत,संकेत टाइम्स : निर्बंध असतानाही तालुकाभर बेधडक दारू,मटका,जूगार चालू आहे.याकडे कानडोळा करत जत‌ पोलीसांनी कोसारीत दारू विक्री विरोधात कारवाई करत डोंगर पोकरून उंदीर पकडला आहे.ठाणे असणाऱ्या जत शहरात अवैध धंद्याचा विळखा पडला असतानाही पोलीसाना दिसत नाही हे‌ विशेष आहे.


कोसारी येथील संभाजी शिवाजी भोसले,विक्रम सावंता तोरवे,विठ्ठल नानासो लिगाडे यांच्या बेकायदा दारू अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकत 12,558 रुपये किंमतीचा देशी दारू साठा जप्त केला आहे.

दरम्यान शेगाव,कुंभारी,आंवढी परिसरात पन्नासवर बेकायदा दारू अड्डे,मटका,गांज्या,चंदन तस्करी,तीपानी क्लब राजरोसपणे सुरू आहेत.

Rate Card

या अवैध धंदे चालकांकडून पोलीसांच्या हातावर वजन ठेवले जात असल्याने कारवाईला पोलिस बगल देत असल्याची चर्चा असून वजन न ठेवणाऱ्यावर कारवाई करून पाठ थोपटून घेतली जात आहे. खरचं कारवाई करायची असेलतर जत शहरातील अवैध धंदे बंद करा,अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.