जत शहरातील रुग्णालयांचा जैविक कचरा उघड्यावर
जत,संकेत टाइम्स : कोरोनाचा विस्फोट वाढलेला असताना जत शहरातील काही रुग्णालये व प्रयोग शाळेतील जैविक कचरा थेट उघड्यावर टाकण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. जत नगरपरिषदेच्या भोगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
जत शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालये,प्रयोग शाळा आहेत.सध्या शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.गेल्या काही दिवसात सुमारे पाचशे वर नवे रुग्ण आढळून आले आहेत.असे असताना जत शहरातील रुग्णालये व प्रयोग शाळेतील जैविक कचरा थेट निगडी रोडवरील कचरा डेपोत थेट उघड्यावर टाकण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे.

असा उघड्यावर कचरा टाकत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय या कचरा डेपो भटकी जनावरे धुडाळत असल्याने त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
जत नगरपरिषदेच्या अशा कारभारावरचे नियंत्रण सुटले आहे.त्यामुळे अशा गंभीर समस्यांना नागरिकांना तोड द्यावे लागत असून नागरिकांचा जीव गेल्यावर नगरपरिषद अधिकारी जागे होणार काय असा सवाल उपस्थित होत आहे.