अथणी-डफळापुर-सांगोला प्रजिमा मार्गाला राज्यमार्ग म्हणुन दर्जा द्यावा

0डफळापूर,संकेत टाइम्स : जत तालुका हा विस्ताराने मोठा असल्याने या तालुक्यातील अनेक गावे अजुनही पूर्णपणे पक्या रस्त्यांनी जोडले गेलेली नाहीत म्हणून या तालुक्यात दळणवळणाचा अभाव दिसुन येत आहे.जत तालुक्याच्या पश्चिमेकडील जास्तीत जास्त गावे एकमेकांना रस्ते मार्गानी जोडण्यासाठी अथणी-डफळापुर-सांगोला या प्रजिमा मार्गाची दर्जाउन्नती करुन राज्यमार्ग करणे गरजेचे आहे.वरिल प्रजिमा मार्ग दर्जाउन्नत होवून राज्यमार्ग झाल्यास या भागातील दळणवळण कमालीचे वाढून गावांचे अर्थकारण वधारण्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदतच होईल.

अथणी-डफळापुर-सांगोला या प्रस्तावित राज्यमार्गामुळे अथणी चिक्कोडी गोकाक हा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील उत्तरेकडील प्रदेश पंढरपूर,अकलुज,इंदापुर,आटपाडी,सोलापूर शहराशी जलदगती रस्ते मार्गाने जोडला जाईल.

डफळापुर,बाज,धावडवाडी,प्रतापपुर,गुळवंची,वाळेखिंडी,सिग्नहळ्ळी,आंवढी,लोहगाव ही जत पश्चिमेकडील गांवे या प्रस्तावित राज्यमार्गाने जोडली जातील.या रस्ते मार्गावर डफळापुर येथे साखर कारखाना,गुळवंची-वाळेखिंडी दरम्यान जत पंचतारांकित औद्योगिक वसाहत(फायस्टार एमआयडीसी),कृषी विद्यापिठ आणि महासौरउर्जा इ,प्रकल्प प्रस्तावित आहेत,तसेच जत रोड रेल्वे स्टेशनही याच मार्गावर आहे .

Rate Card

तसेच वरिल प्रस्तावित राज्यमार्ग कराड-जत एन एच 266 विजापुर -गुहाघर एन.एच.166 ई व जत-इंदापुर एन एच 965 जी सोलापूर -कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील डफळापुर,धावडवाडी,नागज,सिग्नहळ्ळी या गांवाना आणि आरेवाडी देवस्थानाला जोडणारा असणार आहे.सदर रस्त्याचे कर्नाटकातील हद्दीतील अनंतपुर ते बेळगांवी हे अतिउत्तम प्रकारचा गुणवत्ता असलेला दोनपदरी कर्नाटकचा राज्यमार्ग दर्जाचा रस्ता आहे. कर्नाटक राज्य हद्दीतील चौपदरीकरण प्रस्तावित आहे. म्हणुन अथणी-सांगोला मधील डफळापूर कर्नाटक हद्द -बाज-धावडवाडी-गुळवंची-वाळेखिंडी(जत रोड रेल्वे स्टेशन )-सिग्नहळ्ळी प्रजिमा रस्त्याची दर्जाउन्नती करुन राज्यमार्ग म्हणून मंजूरी द्यावी,अशी मागणी होत आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.