जत शहराला रिंग रोड बायपास मार्ग मंजूर करण्याची गरज

0जत,संकेत टाइम्स : आपल्या देशात प्रत्येक तालुका आणि जिल्हा हे कोणत्या-ना कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने जोडले जात आहे त्यामुळे दळणवळणास चालना मिळत आहे पण अजुनही जत आणि मंगळवेढा ही तालुक्याची ठिकाणे कोणत्याही जलदगती मार्गाने जोडली गेली नाहीत म्हणून वरिल राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूंपातर करावे,अशी मागणी होत आहे.जत-मंगळवेढा हा राज्यमार्ग गोकाक-अथणी-जत आणि विजयपुर गुहाघर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे.यामुळे बेळगाव ते पंढरपूर दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे 


तसेच पंढरपूर येथे मुंबई -हैद्राबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्पाचे आणि विजयपुर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामे पुढील दोन वर्षात पूर्ण होणार असल्याने वरिल सुचविलेला प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग दळवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.तसेच जत शहराला रिंग रोड बायपासची आवश्यकता आहे.Rate Card
सध्या जत शहारातुन विजयपूर -गुहाघर एन एन 166 ई ,इंदापूर-जत 965 जी,कराड-तासगाव-जत एन एच 266 राष्ट्रीय महामार्ग जात आहे. गोकाक-जत आणि विजयपुर-यत्नाळ-गुड्डापुर-जत हे दोन राष्ट्रीय महामार्ग कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडून प्रस्तावित असल्याने जत शहरात वाहतुकीची कोंडी आणखीनच वाढणार असल्याने या शहरात रिंग रोड बायपासची आवश्यकता आहे,


म्हणून तो जत-मंगळवेढा राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुंपातरण करताना या प्रकल्पातच जत शहरातील रिंग बायपास मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंजूर होणे गरजेचे आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.