विकेंडला जत तालुक्यात शुकशुकाट रस्ते सुनसान ; कोरोनाची दहशत कायम

0



जत,संकेत टाइम्स : कोरोनाची वाढत असलेली साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारने लागू केलेल्या विकेंड लाॅकडाऊनला जत तालुक्यामध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून 

ग्रामीण भागातील गावातही अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी सर्व व्यवसाय बंद होते.






शुक्रवारी नगरपरिषद व पोलीसांनी बंद बाबत आवाहन केले होते.त्याला व्यापाऱ्यांनी 100 टक्के प्रतिसाद दिला.सकाळपासूनच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, सोलनकर चौक, वाचनालय चौक,जयहिंद चौक, बसस्थानक,पेठेतील मारूती मंदिर, उमराणी काॅर्नर, किस्मत चौक शहरातील प्रमुख बाजारपेठेत आज शनिवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद होती. शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला.






सकाळपासूनच तालुका प्रशासन, जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यानी विकेंड लाॅकडाऊन दक्षता व खबरदारी घेतल्याने शहरासह मुख्य गावातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता.

Rate Card

शहरात लाॅकडाऊन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  पोलीसांची वाहने शहरातून फिरताना दिसत होती.तर चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 





  

दरिबडची,करजगी,माडग्याळ,भिवर्गी,शेगाव,बिळूर, माडग्याळ डफळापूर येथेही लॉकडाऊनला प्रतिसाद‌ मिळाला सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.उमदी,संखमध्ये गेल्या तीन दिवसापासून दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत.दरम्यान तालुक्यातील बहुतांश गावात शनिवारी कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.





जत तालुक्यातील रस्ते‌ असे सुनसान होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.