लंवगातील मलकारसिध्द यात्रा रद्द
जत,संकेत टाइम्स : लंवगा ता.जत येथील ग्रामदैवत मलकारसिध्द यात्रा सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्यास नियोजित होती.मात्र तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेनिमित्तचे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

स्थानिक मोजक्या लोंकाच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये,असे आवाहन श्री.करणी मलकारसिध्द यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे.