कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यमांनी जनजागृती करावी

0



मुंबई : राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यसाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.




विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारीता करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींशी आज मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.


Rate Card




यावेळी माध्यम प्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणाबाबत, आरोग्य व्यवस्था, औषधांची उपलब्धता, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध मुद्यावर अनुभव कथन करतानाच काही सूचनाही केल्या. त्या सूचनांचे स्वागत करतानाच हा संवाद यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी  यावेळी सांगितले.





Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.