दस्तनोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे अनिवार्य

0



सांगली : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयामध्ये दस्तनोंदणीसाठी गर्दी होऊ नये या उद्देशाने दस्त नोंदणी विभागाच्या ऑनलाईन सुविधांचा वापर अनिवार्य करण्यात आले आहे.  तरी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधांचा वापर करावा, असे अवाहन सह. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी साहेबराव दुतोंडे यांनी केले आहे. 






नागरिकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या पीडीएफ द्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत. 


Rate Card





नागरिकांनी सदर पीडीएफ डेटा एंट्री  करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर e-Step-in या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेल्या सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दुरध्वनीवर/समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आगाउु वेळ आरक्षित केली नसल्यास दस्तनोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. 


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.