शिक्षण खात्याच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार उशीराने

0
Rate Card



जत,संकेत टाइम्स : शिक्षण खात्याच्या दिरंगाईमुळे मुंबईसह राज्यातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार उशिरा होत आहेत.त्यासाठी पगार दर महिन्याला 1 तारखेला करावेत, यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी  मागणी केली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे‌ तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली. 



फेब्रुवारी पेड इन मार्चचा पगार तब्बल एका महिना उशिरा झाला आहे.मार्च पेड इन एप्रिलचे पगार दुसरा आठवडा उजडला तरी अद्याप झाले नाहीत. कोविड मुळ निधी वितरण दर महिन्याला मागणी नुसार होत आहे.पगाराची सर्व  रक्कम शिक्षण खात्याने वेळीच मागवली पाहिजे मात्र शिक्षण विभागाकडून असे होताना दिसून येत नाही.



परिणामी त्याचा भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागत आहे पगार उशिरा झाल्याने गृहकर्ज हप्ते ,बँका ,पतसंस्था यांचे हप्ते वेळेत जात नाहीत त्याचा दंडाचा फटका शिक्षकांना सहन करावा लागत आहे.

        

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.