जतेत भाजपा-राष्ट्रवादी कॉग्रेस एकत्र विकासकामे करणार

0जत,संकेत टाइम्स : आमदार विक्रमसिंह सांवत यांची चांडाळ चौकडी विकास कामापेक्षा फसवणूक करत आहे,त्यामुळे तालुक्याचे नुकसान होत आहे, यापुढे जत नगरपरिषदेत भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेस एकत्र विकास कामे करतील,अशी ग्वाही माजी आमदार विलासराव जगताप,माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी दिली.

जत शहरातील वीर शिवा काशिद उद्यान कामाच्या भूमीपूजन प्रंसगी हे दोन्ही नेते बोलत होते.


यावेळी नगरपरिषदेत कॉग्रेस सत्तेत असतानाही,सत्ताधारी आमदार विक्रमसिंह सांवत यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव ही घालण्यात आले होते.त्यामुळे कॉग्रेसच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.तर राष्ट्रवादी,भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचे नियम पाळत झालेल्या या कार्यक्रमात माजी आमदार जगताप,व 

Rate Card

माजी सभापती शिंदे पुढे म्हणाले, आमदार सांवत यांनी तालुक्याची अब्रू घालविली आहे.


राज्याचे सर्वोच्च असलेल्या विधानसभेत बेबी कालवा,हक्कभंग असे नको ते विषय विधिमंडळात मांडून आपली मर्यादा दाखविली आहे.आता हे सर्व जनतेला फसविण्याचे उद्योग थांबवावेत,यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत आ.सांवत यांना एकत्रित इसका दाखवू ,असा इशाराही जगताप,शिंदे यांनी दिला.विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असतानाही जतेत मात्र भाजपा राष्ट्रवादी विकास कामासाठी एकत्र आली असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.