रंगपंचमीला जत पोलीसांचा झिंग झिंग झिंगाटवर धिगाणा

0जत,संकेत टाइम्स : कोरोनाची संचार बंदी असतानाही जत पोलीसाना रंगपंचमीला झिग,झिंग झिंगाटवर ताल धरला होता.सामान्य जनतेला वेटिस धरणारे व ज्यांनी कायदा सुव्यवस्था आंबाधित ठेवण्याची गरज असतानाही कायद्याला धाब्यावर बसविलेल्या जत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रंगपंचमीच्या झिंगाटची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. 

कोरोना बाबतचे सोशल डिस्टसिंग, मास्कचे नियम पायदळी तुडवून झालेल्या या पोलीस ठाण्याच्या आवारातील रंगपंचमीवर जिल्हा पोलीस प्रमुख कारवाई करणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. शनिवारी जत‌ पोलीस ठाण्यालगत‌ एका महिला कर्मचाऱ्यांची पर्स पळविण्यात आली होती तर डफळापूर येथे‌ हाणामारीचा प्रकाराची माहिती मिळूनही त्याचे गांभिर्य‌ न घेता ठाण्याचे सर्व अधिकारी,कर्मचारी कोरोनाचे‌ नियम पायदळी तुडवून रंगपंचमी खेळण्यात व्यस्त झाले होते.

जिल्ह्यात 144 कलम,रात्री 8 नंतर संचार बंदी असतानाही पोलीस ठाणे रात्री उशिरापर्यत गजबजले होते.अनेक अधिकारी, कर्मचारी रंगाची उधळण करत,साऊड सिस्टमच्या तालावर ठेका धरले होते.अगदी वरिष्ठ अधिकारीही यात सामील झाल्याने कायदा-सुव्यवस्था ,जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे धिंडवडे उडविले होते.विशेष म्हणजे अनेक दिवस जत पोलीस ठाण्यात तळ ठोकलेल्या वसूली कलेक्टर पोलीस कर्मचाऱ्यांने या रंगीबेरंगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याची चर्चा आहे.

Rate Card
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.