पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरून महिलेची पर्स पळविली ?
जत,संकेत टाइम्स :जत शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत.शनिवारी त्याचा कहर झाला अगदी जत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घराकडे जाण्यासाठी थांबलेल्या पंचायत समितीच्या महिल कर्मचाऱ्यांची पर्स अज्ञात चोरट्यांनी पळवून नेहल्याची घटना घडली आहे.
पंचायत समिती, न्यायालय,पोलीस ठाणे,तहसील,प्रांत कार्यालये असणारा परिसरही आता असुरक्षित झाला आहे. तेथे शहराचा विचार न केलेला बरा.पोलीस ठाण्याला लाभलेले बेजबाबदार अधिकारी व काही अनेक दिवसापासून तळ ठोकलेल्या बेशिस्त कर्मचाऱ्यामुळे ठाण्याचा धाक संपल्यात जमा झाला आहे.
गेल्या काही दिवसात पोलीसांना तपास,कारवाई पेक्षा वेगळेच कार्यक्रम करण्यात रस असल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान पर्स चोरीची घटना ठाण्यात दाखल झाली नसल्याचे रात्री उशिरापर्यत सांगण्यात आले.

वसूली जोरात
जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी मटका,जुगार,गांज्या,चंदन तस्करी,असे अवैध धंदे अगदी ढिवसाढवळ्या सुरू आहेत.यावर अगदी विधानसभेत मुद्दा उपस्थित होऊनही काहीही फरक पडलेला नाही.उलपक्षी गंभीर आरोप झालेले व गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यात ठिय्या मांडलेल्या कर्मचाऱ्यांनी वसूलीची जबाबदारी हातात घेत,अधिकाऱ्यांना आमदार,नेते,अन्य यंत्रणेचे आम्ही बघतो म्हणून विश्वास देत वसूली मोहिम जोरात सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
नवा वसूली कलेक्टर नेमला?
जत पोलीस ठाण्याला अवैध धंद्यातून बरकत हा विषय जूनाच आहे.माजी आमदार विलासराव जगताप यांनी तर पोलीसांना कुठे किती मिळकत आहे.हे थेट पुराव्याचे संदर्भ देत जाहीर केले होते. आजी,माजी आमदारांनी विधानसभेत अवैध धंद्याचे विषय मांडले आहेत.असे असूनही अवैध धंद्याला बळ देण्याचे प्रकार वाढतच आहेत.जत तालुक्यातील आता नव्याने जत पोलीस ठाण्याला हजर झालेल्या जेष्ठ कर्मचाऱ्यांकडे नव्याने वसूलीची जबाबदारी दिल्याची चर्चा सुरू आहे.