तुकाराम बाबा ‘एन यु जे महाराष्ट्र -2021’ पुरस्काराने सन्मानित
जत,संकेत टाइम्स : चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे हभप तुकाराम बाबा यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत नॅशनल युनियन ऑफ जनरारालिस्ट यांच्यावतीने ‘एन यु जे महाराष्ट्र -2021’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
तुकाराम बाबा यांनी धार्मिक बमव सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बाबा हे कायम धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजजागृती करण्या बरोबरच जत पूर्व भागाला म्हैसाळचे पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी संख ते मुंबई मंत्रालय पायीदिंडी काढली. जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील पहिली खाजगी चारा छावणी काढून पशुधन वाचवले.250 हुन अधिक जणांना पाण्याच्या टाक्याचे वाटप केले.

कोरोना काळात साडेसात हजार मास्क, साडेपाच हजार कुटूंबियांना जीवनावश्यक किट, 22 हजाराहून अधिक जणांना थेट घरोघरी लॉकडाऊन काळात भाजीपाला वाटप केला.जळीतग्रस्त कुंटुबियांना मदत करणे,अशा सामाजिक कार्यात बाबा अग्रेसर असतात.त्यांच्या या कार्याची दखल घेत नॅशनल युनियन ऑफ जनरारालिस्ट यांच्यावतीने ‘एन यु जे महाराष्ट्र -2021’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
एन यु जे महाराष्ट्र -2021 पुरस्काराने तुकाराम बाबा सन्मानित करताना मान्यवर
